🚩श्री. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक (AISSMS कॉलेज, शिवाजीनगर)
🚩 छत्रपती शिवाजी पूल (कॉर्पोरेशन पूल किंवा नवा पूल)
🚩 शिवाजीनगर (पूर्वीचे नाव भांबवडे)
🚩छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (शनिवारवाडा ते स्वारगेट दरम्यान)
🚩 छत्रपती संभाजी महाराज पूल (लकडी पूल)
🚩छत्रपती संभाजी महाराज रस्ता (ज्ञान प्रबोधिनी शाळा, सदाशिव पेठ)
🚩छत्रपती संभाजी महाराज उद्यान (जंगली महाराज रस्त्यावर)
🚩छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यात उद्याने, शिक्षणसंस्था, शाळा व गणपती मंडळ देखील आहेत.
🚩छत्रपती राजाराम महाराज पूल (सिंहगड रोड)
🚩जिजामाता चौक (लाल महालाजवळ)
🚩राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब मार्ग (पौड रोड)
🚩पंडित गागाभट्ट चौक (फडके हौदाजवळ, गणेश रोड)
🚩नरवीर तानाजी मालुसरे पथ (सिंहगड रोड)
🚩नरवीर तानाजी मालुसरे वाडी (शिवाजीनगर)
🚩जिवा महाले चौक (अपोलो टॉकीज येथील चौक, रास्ता पेठ)
🚩वीर नेताजी पालकर चौक (मित्रमंडळ चौक)
🚩वीर बाजी पासलकर चौक (सिंहगड रोड)
वीर बाजी पासलकर यांच्या नावे उड्डाणपूल, स्मारक व उद्यान सिंहगड रोडवर आहे. तसेच वरसगाव धरणाला नाव देखील वीर बाजी पासलकर यांचे दिलेले आहे.
🚩वीर संताजी घोरपडे मार्ग (PMC च्या पुलाकडून जो रस्ता कुंभारवेशीपासून पुणे स्टेशनला जातो तो म्हणजेच शाहीर अमर शेख चौकापर्यंत)
🚩श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्ता (अभिनव चौक ते शनिवारवाडा)
🚩श्रीमंत नानासाहेब पेशवे चौक (पर्वती टेकडी पायथा येथील चौक)
🚩श्रीमंत थोरले माधवराव पेशवे रस्ता (थोर साहित्यकार ना. सी. फडके चौक ते हिराबाग चौक)
🚩चिमाजी आप्पा पेशवे पथ (मित्रमंडळ चौक ते अभिनव चौक)
🚩चिमाजी आप्पा पेशवे चौक (ओंकारेश्वर मंदिर चौक, बालगंधर्व पुलाजवळील)
🚩रामशास्त्री प्रभुणे पथ (सुयोग मंगल कार्यालय, शनिवार पेठ)
🚩नारायण पेठ (नारायणराव पेशवे यांच्या स्मरणार्थ)
🚩सदाशिव पेठ (सदाशिवरावभाऊ पेशवे यांच्या स्मरणार्थ)
🚩नाना पेठ (पेशवाईतील सुप्रसिद्ध नाना फडणवीस यांच्या नावाने पेठ)
🚩अहिल्यादेवी होळकर चौक (अहिल्यादेवी शाळा, शनिवार पेठ)
🚩रास्ता पेठ (रास्ते नावाचे पेशवाईतील प्रसिद्ध सरदार)
🚩घोरपडे पेठ (घोरपडे नावाचे प्रसिद्ध पेशवाईतील सरदार)
🚩झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक (बालगंधर्व रंगमंदिरासमोर, जंगली महाराज रस्ता)
🚩महाराणा प्रताप उद्यान ( थोरले बाजीराव रस्ता, सदाशिव पेठ)
🚩महाराणा प्रताप रस्ता (रविवार पेठ)
---------------------------------------------------------------------------------
© सुप्रसाद पुराणिक
No comments:
Post a Comment