सुरक्षित पावसाळी भटकंतीसाठी....

पावसाळी पर्यटनाला निघालात ?? जरा काळजी घ्या. कारण अलीकडच्या काही वर्षात  अतिसाहसामुळे , सेल्फीच्या वेडापायी अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. त्यामुळे अशा ठिकाणी विशेष खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. अशी घ्या काळजी -

किल्ले राजमाची

# पर्यटस्थळाची जास्तीत जास्त माहिती गोळा करा . संबंधित ठिकाणचा नकाशा असेल तर जवळ ठेवा , गुगल मॅप्स आणि गुगल अर्थचा माहिती करिता वापर करता येईल.

# ऑफरोड बाईक राईड असेल तर गाडीतील हवा व पेट्रोल मुबलक असणे महत्वाचे ठरते. शक्यतो  वाहनाचे सर्व्हिसिंग करून घ्या.

#‌ एखाद्या आडवाटेवरच्या गडावर जाणार असाल तर स्थानिक वाटाड्याला सोबत घेऊन गेलेलं केव्हाही चांगलं , अथवा पायथ्याच्या गावात गडाच्या वाटेसंबंधी विचारपूस करा. किंवा ट्रेकिंग विषयीचे पुस्तकाचे मार्गदर्शन घ्या.

#‌ सोपी वाट असताना ती सोडून अवघड वाटेने जाण्याचा प्रयत्न करू नका.

‌# छत्री , रेनकोट , टोपी , सॅकचे कव्हर , पावसाळी किंवा ट्रेकिंगचे बूट , बेसिक फर्स्ट एड बॉक्स , टॉर्च , दिशादर्शक उपकरण , स्नॅक्स सोबत ठेवा .

‌# पावसाळ्यात धुकं आणि पावसामुळे व्हिझिबिलिटी कमी असते आणि वाटा सुद्धा निसरड्या  झालेल्या असतात , त्यामुळे सेल्फीसाठी डोंगराच्या उंच कड्यावर किंवा धबधब्यासारख्या धोकादायक ठिकाणी जायचा मोह टाळा. सुरक्षित ठिकाणी सेल्फी किंवा फोटोसेशन करण्यास काहीच हरकत नाही . स्वतःच्या फोटोंपेक्षा ती ठिकाणं जास्तीत जास्त  समजून घ्यायचा प्रयत्न करा.

‌# ट्रेकला जाताना शक्यतो कार्गो पँट निवडा. कारण तिला बरेच खिसे असल्याने त्यांचा वापर होऊ  शकतो. आपले कपडे हे निसर्गाशी एकरूप होणाऱ्या रंगाचे असावेत. भडक रंगाचे कपडे बाहेर सहलीला जाताना टाळावेत. अंगाला न चिकटणारे व पटकन वाळणारे सिन्थेटिक व नायलॉनचे कपडे उत्तम . 

‌# उतारावर पाऊल तिरकं टाका , जेणेकरून शरीराचे संतुलन राखले जाईल. उतरताना टाचेकडचा भाग आधी मातीत किंवा खोबणीत रोवा म्हणजे पायांना पकड मिळेल. पुढचे  पाऊल टाकताना आपले मागच्या पाऊलाचा आधार भक्कम आहे ना , ते बघा . घुडघ्यांवरचा जोर कमी करण्यासाठी उतरताना काठीचा आधार पण फायदेशीर ठरतो. 

# घरी आल्यावर पाय खूप दुखत असतील , तर कोमट पाण्यात मीठ टाकून पाय सोडून बसा म्हणजे पायांना आराम मिळेल . 

‌# मोबाईल भिजू नये म्हणून सहज सोप्पा उपाय म्हणजे छोटी प्लास्टिक पिशवीत मोबाईल ठेवा. जर मोबाईल ओला झालाच तर घरी आल्यावर  तांदळाच्या डब्यात ठेवा. तांदूळ आद्रता शोषून घेतो.

‌# आपण सृष्टिसौन्दर्य , गडकिल्ले , मंदिरे , लेणी पहायला घराबाहेर पडत आहोत हे लक्षात ठेवा.

Source - Google  

Source - Google

-------------------------------------------------------------------------------
© २०१९ सुप्रसाद पुराणिक

No comments:

Post a Comment

INSTAGRAM FEED

@suprasadp